Tuesday, September 30, 2025

चिकटपट्टी

स्त्यात मला

चिकटपट्टी भेटली,

दप्तरात माझ्या

घुसकन घुसली!

शाळेत माझी 

पेन्सिल तुटली,

होती ताठ

खट् खटकली!

दप्तरातून चिकटपट्टी

बाहेर निघाली 

दोन तुकड्यांना 

बिल बिलगली!

बिलगून मग

गोऽऽल फिरली

गर्र गिरकी

फिर्र बिलगली!

जुळले तुकडे

आहा! ओहो!

ताठम् ताठ, 

नरम नरमली!

No comments:

Post a Comment