ए आय! मला आळसात जाऊ दे!
एकदाचं गं, थिजुनी मला, मंद मंद होऊ दे!
ए आय! मला आळसात जाऊ दे!
एकदाचं गं, थिजुनी मला, मंद मंद होऊ दे!
Two out of twenty questions that I answer for myself, to keep my brain in check (as if it's possible! 😀)-
1)
Whenever I notice that I really dislike/not love/disagree with/hate/disrespect someone for a long time, I ask myself- If this person starts and continues to do everything properly/accurately/ethically/rightly/nicely, will I start liking him?
Let's take some examples, of famous political figures, because chances of mass dislike are more there-
If Narendra Modi does good work in every way, consistently, then will I vote for him?
If Arnav Goswami demonstrates great journalism consistently, will I like him?
If Rahul Gandhi does sensible work for the country consistently, will I support him?
If Kunal Kamra does unbiased, respectful, quality jokes consistently, will I like him?
2)
Whenever I notice myself thinking "How can she do this!!!" about someone, I ask myself- Are there any, possibly very rare and specific, circumstances in which I might do the same?
Again, examples-
How can he just push his car through that traffic and create a bigger jam!
How can my lovely friend get so angry that he hurt his wife so badly!
How can that policeman hit that boy so badly!
Are there any, possibly very rare and specific, circumstances in which I might do the same? No? Sure? 100%?
Answering these two questions tells me something about the rigidity of my brain and forces me to update my priorities.
Such ego! To assume such seriousness! Nevertheless!
If you are invested in me, chances are that you will be affected by my death. (Again and again, such ego!) But really, there’s nothing much to death than the fact that everybody dies. Cliche. The only sensible grief is that you will miss my physical presence. That’s the real pain. Another cliche. And as everybody knows, one heals over time. You will. Please do! Keep sleeping well, keep shitting well, keep exercising, keep eating less and less processed food. (However you parse the lesses! Lesser the merrier!) Or, if I have died of exercising and eating less processed food, then you would know better!
P.S.- I enjoyed writing this piece. And I did wish I shouldn’t die before I finish writing. And I didn’t. Die! Because I have finished. Writing!
एकोप्याचा अर्थ काय?
आमच्या कुटुंबात अनेक परस्पर विरोधी राजकीय जमातींचे लोक आहेत. स्वतःची मते परखडपणे जगजाहीर करणारे, मनातच ठेवणारे, वाद नकोत इतपत हळूच थोङेसे बोलून दाखवणारे, इ. सगळे प्रकार त्यात आहेत. अत्यंत अवघड ते अत्यंत सहज स्वभाव तर आहेतच. जगण्याच्या रीती वेगवेगळ्या आहेत, जाती वेगवेगळ्या आहेत, कामांचे स्वरूप वेगवेगळ्या टोकांचे आहे.
एवढे वेगळेपण असलेली मोठी कुटुंबे बरेचदा बऱ्यापैकी विभक्त झालेली दिसतात. कधीतरी चांगल्या/वाईट प्रसंगात थोडावेळ हजेरी लावणे किंवा बाहेरच्यांसमोर एकी आणि मनात विष बाळगणे दिसते. एकमेकांची तोंडे न पाहणारी पालक-मुलेही-भावंडे मी पाहिली आहेत.
ह्या पार्श्वभूमीवर आमच्या कुटुंबातील व्यवहार मला एकोप्याकडे झुकणारा वाटतो.
काय असतो हा एकोपा? कसा दिसतो?
एकोपा म्हणजे अनेक क्षमाशील लोक. पुन्हा पुन्हा नव्याने प्रेम करत राहणारे लोक. मतभेद म्हणजे माणूसभेद नाहीत, हे जाणणारे लोक. तुला अत्यंत त्रागा होणारे सामाजिक मुद्दे मांडत आज मी मोठ्या सभागृहात भाषण दिले तरी तो माझ्या आयुष्यातला मोठा क्षण आहे ह्याचे कौतुक तुला वाटावे लागते आणि त्यानंतर मला पाऊस लागू नये म्हणून घरी सोडायला तू वेळेच्या आधी सभागृहाच्या दारात हजरही राहावे लागते; हे समजणारे लोक. आपले नाते रक्ताचे, रक्त आत सर्वत्र आहे, फक्त मेंदूत नाही, त्यामुळे विचारांसोबतच सर्वांगाने एकमेकांसाठी सतत असत राहणारे लोक.
आमचे आजी-आजोबा, म्हणजे डॅा. गणेश दामोदर सप्तर्षी आणि मंदाकिनी गणेश सप्तर्षी हे तसे लोक. त्यांनी स्वकष्टाने घरात पाडलेला हा एकोप्याचा पायंडा, त्यांच्या पुढच्या पिढीने उचलून धरला, त्यामुळे आम्हाला एवढी कौटुंबिक स्थिरता आयती मिळाली. कुमारकाकांबद्दल आम्ही सर्वजण ज्या पद्धतीने व्यक्त होत आहोत त्यातून आमच्या पुढच्या पिढीलाही हे जाणवत आहे. त्यातून कुमारकाका फक्त कुटुंबियांचे नसल्याने, आम्हाला आणि आमच्या पुढच्या पिढीला अजून एक मोठी गोष्ट जाणवत आहे- हे हजारो लोक जे कुमारकाकांसाठी येत आहेत, त्यात सर्व जाती-धर्म-पंथ-पक्ष-विचारसरणीचे लोक आहेत. नक्कीच ह्याचा आम्हा सर्वांच्या जाणिवे-नेणिवेवर असर होत राहील आणि आम्ही फक्त कुटुंबात नाही तर समाजातही एकीकडे झुकण्याऐवजी ‘एकी’कडे झुकत राहू. आहार-विहार-आचार-विचारांहून खूपच जास्त घट्ट, ऋणानुबंधाच्या गाठी बांधत राहू.
Does it even make sense to demand resignations?
What after resignation?
Should NEET or the present education system even exist?
What if this is all funded?
Is this BJP’s plan to mask something else?
Is there a greater game afoot which we cannot even imagine right now?
Has Sonam Wangchuk been managed?
Why are they making it political?
What will come out of this anyway?
Good questions, dear rationals. Let us keep at it.
But while we are at it, please let us try to enlighten ourselves by visiting a protest near us, or if that’s not very near, by watching the sea of protest footage by random individuals. Let’s install Instagram if need be. Let’s not watch any of our usual, famous, known people. Let’s watch footage from the protest sites uploaded by the people there. (We may also soak in the meme and reel rain intermittently.) Either visiting a protest nearby or watching this footage will take up about 4 hours of our time. And then… Then we think. That won’t take long, if we allow ourselves to.
Oh and by the way, we do this for us. They really don’t need us. We do this for our own enlightenment. Mainly to understand what’s possible in today’s world.
Since we are actually going and experiencing a protest or watching a lot of unedited raw protest footage, simpler questions such as- which video is real and which one is AI, aren’t the protestors going violent and hitting the police, aren’t the police being brutal, why are facial records of the protestors being made, why are there plain-clothed police people, why are there police cameramen, etc get answered easily. So these questions aren’t listed above. More difficult questions like, is this protest funded, are handled beautifully by genZ reels, but if we don’t like to laugh out loud, we may get back to being our serious thoughtful rational selves-
Even if it doesn’t make sense to demand resignations,
even if nothing major happens after the resignation,
even if this education system itself needs reconsideration,
even if this protest is funded,
even if BJP is masking something else,
even if there’s a greater game afoot which we cannot even imagine right now,
even if Sonam has been managed,
even if they make it political,
even if nothing life-altering comes out of this,
what we experience in the actions of these youngsters (if you are visiting a protest) or what we see in the footage by lakhs of individuals is unignorably precious.
The vibe is real. The creativity is extreme. This isn’t a serious-faced slogans-chanting agitation that we are used to. They are real and funny. They are angry and laughing. They are careful and cheerful. They are shaking the system and dancing. They are right and left, rich and poor, Hindu and Muslim, brahmin and dalit. Their speakers are announcing and telling the crowds to take down all other flags except the Indian national flag because they want no other ideology other than love for the nation and the crowds are happily complying. Their speakers are taking the mics away from other invited speakers if they are making provocative speeches and reminding the crowds again and again to protest peacefully, in a Gandhian way, without any violence. They are enjoying their part. Very seriously.
We, who have been trained so well about there being two things, and then about the two being opposite things, and then about the impossibility of their coexistence; can really learn a lot from this. And even if we don’t learn, the fact that this can happen, that it really happened, should be enough to bring us one step down from our pedestals.
With their lack of focus, short attention span, huge screen time; they are trying to crack the system, which includes us, by cracking jokes. We better crack open and laugh heartily and bask in their glory, or else… Or else we lose. We lose out on growing up. They don’t care. They’ll make a bigger joke out of us and move on.
क्या तुम अमर हो?
आपल्या मुलांसोबत इतिहासाचा अभ्यास का करावा?
इतिहास म्हणजे शिवाजी महाराज, फ्रेंच राज्यक्रांती, वगैरे पुस्तकातले धडे तर आहेतच. त्याचबरोबर माझा, माझ्या मुलांचा, एखाद्या मित्रासोबतच्या मैत्रीचा, माझ्या टूथब्रशचा, नदीच्या दुर्गंधीचा, विहिरीतल्या पाण्याच्या पातळीचा, परवा आईसोबत झालेल्या भांडणाचा, घरात घेतलेल्या मोठ्या निर्णयाचा, इंटरनेटचा, नामशेष झालेल्या पक्ष्याचा, तणनाशकाचा, धर्मांचा, ग्रहताऱ्यांचा, ऑक्सिजनचा, पोलिओचा, विचारांचा, गणिताचा, भूगोलाचा, इतिहासाचा… अशा कितीतरी गोष्टींचा इतिहास आहे!
इतिहासाचा अभ्यास हा एक परिपूर्ण अभ्यास असू शकतो. उदाहरण म्हणून विहिरीतल्या पाण्याच्या पातळीचा इतिहास घेऊ. विहीर बांधली तिथपासून सुरुवात करायची असेल तर ते आधी शोधावं लागेल. म्हाताऱ्या गावकऱ्यांशी बोलावं लागेल. जुनी गाणी, गोष्टी वाचाव्या लागतील. जुनी वर्तमानपत्रं, नकाशे, योजना, दस्तावेज अभ्यासावे लागतील. विहिरीचा वापर किती, कोण, कशासाठी करत आले आहे, त्यात काय बदल झाले आहेत, ह्याचाही अभ्यास करावा लागेल. बांधकामं, दुष्काळ, अतिवृष्टी, बदलती भूरचना अशा इतर घटना बघाव्या लागतील, परस्परसंबंध शोधावे लागतील. एखादं नवीन तंत्रज्ञान वापरून अधिक माहिती मिळवावी लागेल. माहितीचं विश्लेषण करावं लागेल. वगैरे! मिळालेल्या सर्व माहितीबद्दल, कोणाकडून मिळाली, कुठल्या काळातली आहे, कुठल्या पद्धतीनं मिळवली गेली आणि त्यावेळची परिस्थिती काय होती ह्यानुसार त्यातला पुरावा असलेला भाग किती आणि मतं, पूर्वग्रह आणि अभिप्राय किती ह्याचा अंदाज बांधावा लागेल. हे सगळं करत असताना, अमुक गल्लीत राहणारे सगळे दीडशहाणे आहेत त्यामुळे त्यांच्याशी बोलण्यात अर्थ नाही किंवा एवढे बोअर खणलेत गेल्या दहा वर्षांत म्हणजे पाणी पातळी नक्कीच खालीच गेली असणार अशा माझ्या डोक्यातल्या धारणा शोधण्याचा आणि त्यांना माझ्या शोधप्रक्रियेच्या आणि अभ्यासाच्या आड न येऊ देण्याचा प्रयत्न सतत करत राहायला हवा. मिळालेल्या पुराव्यानुसार, पाण्याच्या पातळीबद्दल त्यातल्या त्यात खात्रीलायक निष्कर्ष मांडता यायला हवेत. नवीन पुरावा मिळाल्यास निष्कर्ष बदलता येणारं मोकळं मनही हवं. त्यापुढे, भविष्यासाठी हा इतिहास काय मार्गदर्शन करतोय हे येईल. एकूण काय, तर इतिहासाच्या अभ्यासात तर्कशास्त्र, गणित, विज्ञान, तंत्रज्ञान, शास्त्रोक्त संशोधन पद्धत, आत्मपरीक्षण वगैरे सगळंच येतंय.
आता हे सगळं शास्त्र परवा आईसोबत झालेल्या भांडणाला लावून पाहा. (आई-मुलाचं नातं असेल तिथे इतक्यात कधी तरी कुठला तरी वाद झालेला असेलच, असं गृहीतक आहे!) म्हणजे भांडण परवा झालं तेव्हा नेमकं काय झालं - आईच्या मते, मुलाच्या मते, घरातील इतरांच्या मते आणि आवाजाची एक पातळी गाठलीच असेल, तर शेजाऱ्यांच्या मते. आता दोन दिवस होऊन गेलेत, तर भांडण झालं तेव्हा काय झालं ह्याबद्दलची आजची मतंदेखील पाहा. मग ते का झालं ह्याबद्दल हेच सारं करून बघा. वर लिहिल्याप्रमाणे पुराव्याचा भाग किती आणि मतं, पूर्वग्रह आणि अभिप्राय किती ह्याचा अंदाज बांधा. निष्कर्ष काढताना स्वतःच्या धारणा बाजूला ठेवा आणि स्वतः काढलेला निष्कर्ष बदलता येणारं मोकळं मन असू द्या. निष्कर्षातून मग भविष्य सुसह्य करायचं असेल किंवा बदला घेत राहायचं असेल त्यानुसार मार्गदर्शन होईलच! विहिरीपेक्षा इथे हे सगळं जास्त अवघड असेल कारण तुम्ही ह्या इतिहासाच्या आत आहात!
आई-मुलाच्या जागी वेगवेगळे देश / गट / समाज ठेवून पाहू. त्यांच्या इतिहासाकडे एक देश / गट / समाज म्हणून आपण वरील प्रकारे बघतो का? एखादा समाज स्वतःच्या इतिहासाकडे कसा पाहतो ह्यावरून त्या समाजाचं वर्तमान आणि भविष्यातील आरोग्य ठरत असेल का? इतिहासाचा अभ्यास नवीन घाव घालण्यासाठी करण्याऐवजी जुने घाव भरून काढून जास्त निरोगी होण्यासाठी करता येईल का?
हे मोठ्यांचे मोठे प्रश्न बाजूला ठेवले तरी तर्कशास्त्र, गणित, विज्ञान, तंत्रज्ञान, शास्त्रोक्त संशोधन पद्धत, आत्मपरीक्षण वगैरेंसोबत आपली आणि मुलांची मैत्री वाढवायची असेल, तर इतिहासाचा अभ्यास हा एक उत्तम मार्ग आहे.