Thursday, September 3, 2026

AI

ए आय! मला आळसात जाऊ दे!

एकदाचं गं, थिजुनी मला, मंद मंद होऊ दे!


मेघ कसे बघू गडगड करिसी,
विजा नभांतून तूच खुणविसी,
तुझ्याचसंगे कुंपणात मज खूप खूप नाचू दे!

बदकांचा बघू थवा हवा तो,
बेडुकदादा हाक मारतो,
तुझ्याचमधुनी माझा मजला पाठलाग करू दे!

धारेखाली उभा राहू मी?
पायाने मी उडवू पाणी?
ताप-खोकला-शिंका-सर्दी, वाट्टेल ते भासू दे!



No comments:

Post a Comment