Tuesday, July 18, 2023

 शुभम गेला केळी आणायला केळी आणायला केळी आणायला 

तीस रुपयाला बारा केळी

वीस रुपयाला दे रे बाबा दे रे बाबा दे रे बाबा


शुभमदादा जा जळगावला

शुभम गेला जळगावला जळगावला जळगावला

वीस रुपयाला बारा केळी

दहा रुपयाला दे रे बाबा दे रे बाबा दे रे बाबा


शुभमदादा जा चोपड्यात 

शुभम गेला चोपड्यात चोपड्यात चोपड्यात

पाच रुपयाला बारा केळी

फुकट दे रे माझ्या राज्या माझ्या राज्या माझ्या राज्या 


शुभमदादा जा शेतावर

शुभम गेला शेतावर शेतावर शेतावर

सटकून पडला चारीत!



१. ह्या गाण्यातल्या घटनांची रंगवून रंगवून गोष्ट सांगता येईल. त्यात मधे मधे गाणं सर्वांसोबत म्हणता येईल. 

२. शुभम आणि गावांची नावं बदलता येतील- मुलांची नावं आणि त्यांच्या गावांच्या नावांनुसार. 

३. केळीऐवजी त्यांच्या जगातलं काही घेता येईल. 

४. गिनती वाढवून, गावं वाढवून कडवी वाढवता येतील. 

५. मधेच महाग शहरात जाऊन परत स्वस्त गावात येता येईल. 

६. गणित शिकवताना गाणं वापरता येईल- ५ रुपयाला ५ केळी म्हणायचं आणि विचारायचं- स्वस्त झालं की महाग.

७. गाणं भिलाऊ शब्द वापरून लिहिता येईल. 

८. शुभम सुरूवातीला कुठल्या शहरात असेल हे ओळखायला सांगू शकतो. 

९. कुठली वस्तू कुठल्या दिशेने गेल्यास स्वस्त होत जाते, ह्यावर जमल्यास गप्पा करू शकतो. इकॅानॅामिक्स शिकण्याची सुरूवात!

१०. मुलांना असं गाणं बनवता येईल.

No comments:

Post a Comment