Wednesday, January 25, 2017

तू

तुझे प्रकाशकण वेचता वेचता
तुझ्यापर्यंत पोचलो.
तुला वेचतो हल्ली हळूच, चोरून.
प्रकाशाचा रंग बदलू न देण्याची जबाबदारी घेऊन.
तुला कळतं का गं?
मला कळतं का गं?
आयुष्य अवघडे माझं.


No comments:

Post a Comment