#Function: noun #Etymology: short for Weblog
Wednesday, January 25, 2017
Hangover
Hangover म्हणजे
तू गेल्यावर
तुझा थरथरता हात आणि उच्छ्वास
माझ्याकडेच राहणे.
तू
तुझे प्रकाशकण वेचता वेचता
तुझ्यापर्यंत पोचलो.
तुला वेचतो हल्ली हळूच, चोरून.
प्रकाशाचा रंग बदलू न देण्याची जबाबदारी घेऊन.
तुला कळतं का गं?
मला कळतं का गं?
आयुष्य अवघडे माझं.
दारू
ती
पूर्ण शुद्धीत
नशाविरहित
ढळत आहे
सगळं गवसलेलं असतानाही
सगळं वेगळं वाटवणाऱ्या
संधीवर
कधी कधी एवढं bore होतं...
... की कविताही कराविशी वाटत नाही!
‹
›
Home
View web version